रोणापालमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरास प्रतिसाद

*⚡बांदा ता.२०-:* महिलांना कायदेविषयक ज्ञान असणे फार गरजेचे झाले आहे. समाजात निर्भीडपणे वावरण्यासाठी महिलांनी कायद्याच्या आधारे बोलावे आणि त्यासाठी कायदेविषयक ज्ञान आवश्यक आहे, असे प्रतिपादन रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांनी केले. न्याय वीधी सेवा प्राधीकरण समिती सावंतवाडी मार्फत रोणापाल अंगणवाडीत आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी सावंतवाडी न्याय विधी सेवा प्राधीकरण समिती अध्यक्ष तथा सावंतवाडी दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती बेडगकर, सरपंच सुरेश गावडे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, माजी सरपंच उदय देऊलकर, बाबु बाबली गावडे, विष्णु सावंत, अरुण परब, अर्जुन गावडे ,संजय शेगडे, राजश्री नाईक, यमुना नाईक, सिताबाई नाईक, अरूणा, शेजल, विश्रांती, मंगल, मोहीनी, मेघा नांगरे, अंगणवाडी सेविका तसेच आजुबाजुच्या परिसरातील ग्रामस्थ व महिलांनी कायदेविषयक विषयक शिबिराचा लाभ घेतला. कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सौ. परब २०१६-१७ पासुन न्याय वीधी सेवा प्राधीकरण समिती सावंतवाडीचे वीधी स्वयंसेवक आहेत. त्यामुळे मार्गदर्शक म्हणुन निर्जरा परब यांची नेमणूक केली होती. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायतने केले होते. सौ.निर्जरा परब यांनी, लोकन्यायालय, विधी सेवा प्राधीकरण कायदेविषयक माहिती, मध्यस्थी, वैकल्पिक वादनिवारण पद्धती, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा,२००५ , रॅगिंग, गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार २००९, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार यांविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी कायदेविषयक विचारलेल्या समस्यांचे निवारण कसे करावे याविषयी सुद्धा योग्यरित्या मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक सरपंच सुरेश गावडे यांनी तर आभार ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी मानले.

You cannot copy content of this page