सावंतवाडी-:कोरोना महामारीच्या काळात पहिल्या पासुन ज्या ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. त्या त्या ठिकाणी संजू विर्नोडकर आणि त्यांची टीम जिल्हाभर निर्जंतुकीकरण करत फिरत आहे. चतुर्थीच्या ऐन सणात देखील संजू विर्नोडकर आणि त्यांची टीमने मळगाव, सावंतवाडी शहरातील माठेवाडा, सालईवाडा, खास्किलवाडा अशा इतर भागातील बाधितांच्या घरात , लगतच्या व आजूबाजूच्या घरात जाऊन निर्जंतुकीकरण केले आहे. या कार्यात त्यांना संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे, दिपक केदार, राजवी विर्नोडकर, सुकन्या टोपले, संचीता गावडे, यांनी सहभाग घेतला. गणेश उत्सव काळात देखील न थांबता संजू विर्नोडकर आणि त्यांची टीम करत असलेले कार्य पाहून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
गणेश चतुर्थी काळात देखील संजू विर्नोडकर आणि टीमचे सेवा कार्य अखंडित सुरू
