भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस कोण करणार?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल;आता तरी मदतीचा हात पुढे करा!

*⚡कणकवली ता.१८-:* लॉकडाऊनला १७/१८ महिने झाले.मात्र या कालावधी भजनी बुवा, दशावतारी कलावंत यांची विचारपुस करावी असे कुणालाही वाटु नये, याला काय म्हणायचे. ना कुणी विचार केला, ना मदतीचा हात पुढे केला,असे हात पसरल्या शिवाय काही आपण करणारच नाही, यालाच लोकशाही म्हणायचे? असा सवाल कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला आहे. पारतंत्र्यात असतो तर समजु शकलो असतो, मनाची समजूत करून घेतली असती, पण या अखंड भारत देशात लोकशाही आहे ना?मग प्रत्येक बाबतीत आंदोलन, मोर्चे काढले जातात, आजच्या काळात जसा व्यावसायिक देशोधडीला लागलाय, कर्ज बाजारी झालाय, तसेच आज भजनी बुवा/दशावतार कलावंत सुध्दा देशोधडीला लागलाय, एक वेळ च्या जेवणासाठी महाग झालाय, कोण देणार याचे उत्तर!हेच कलावंत संपुर्ण महाराष्ट्रात भजने करुन समाज प्रबोधन करतात,दशावतार कलावंत कोणत्याही प्रकारचे लेखना शिवाय धार्मिक/वास्तविक/ऐतिहासिक कला सादर करतात, अशा या देशोधडीला लागलेल्या कलावंतचा विचार करावा असे कुणालाही वाटले नाही.आता तरी विचार करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page