कुडाळकर यांची विरोधकांवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार टीका
*⚡मालवण ता.१७-:* मालवण सारख्या पर्यटन राजधानीला टक्केवारीच्या विळख्यातून मुक्त करण्यात मालवणचे नगराध्यक्ष श्री महेश कांदळगांवकर यांचे मोठे योगदान राहिले असून मालवणच्या सर्वांगीण व सर्वंकष विकासाकडे जातीने लक्ष देत नगराध्यक्षांनी भरीव कार्य केले आहे आणि त्याचमुळे सर्व स्तरातून नगराध्यक्षाचे होणारे कौतुक विरोधकांच्या मात्र पचनी पडत नसल्याची टीका करीत प्रसिद्धी पत्रकातून करीत शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी राजकारण करायला काहीच मुद्दे अथवा विषय मिळत नसल्या कारणाने विरोधक अधिक वैफल्यग्रस्थ होऊन मानसिक संतुलन बिघडल्यासम बेछूट-बेलगाम, निराधार व बिनबुडाचे आरोप करत सुटल्याचीही टीका श्री कुडाळकर यांनी केली आहे मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर नगरपालिकेतील विरोधकांनी केलेल्या टिकेला शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख मालवण गणेश कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे प्रसिद्धी पत्रकात गणेश कुडाळकर यांनी म्हटले आहे की, ज्यांनी कुणी मालवण नगरीत झालेले बदल जवळून अनुभवले आहेत ती मायबाप जनता-जनार्दन आज नगराध्यक्ष व त्यांच्या टीम चे तोंड भरून कौतुक करताना दिसत आहे. खासदार श्री विनायक राऊत, पालकमंत्री श्री उदय सामंत आणि आमदार श्री वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणचा शाश्वत विकासाकडे होणार प्रवास काही नतद्रष्ट लोकांना पाहवत नसल्यानेच असे वातावरण बिघडवणारे आरोप करून आपल्या मालकांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सूरु आहे असल्याचे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की, वरिष्ठ स्तरावरून मालवण साठी भरीव निधीची तरतूद करताना खासदार- आमदार अथवा पालकमंत्री यांनी नगराध्यक्षांवर दाखवलेला विश्वास हीच त्यांच्या कार्यप्रणालीची पावती आहे पूर्वी सारखे निधी लाटण्याचे दुकान आता चालत नाही हे बघून बऱ्याच जणांचा पोटशूळ उठलाय. त्यात स्वतः मालक आता रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू होताच आपण काहीही करून लोकांच्या चर्चेत यायला पाहिजे हा अट्टाहास असल्याने अश्या पत्रकार परिषदा घेतल्या जातात आणि पुढे त्या अजून वाढतील यात शंका नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली आहे . असे म्हटले जाते की “योद्धा जेव्हा पराभूत होत नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते” इथेही नगराध्यक्षाना बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू असून कोरोना सारख्या जागतिक महामारी दरम्यान जिथे विरोधक फक्त नगरपालिकेच्या सभेचे घाणेरडे राजकारण करू इच्छितात तेथे या महामारी दरम्यान मालवण नगरपालिकेने केलेले कार्य खरेच कौतुकास्पद असल्याचे पत्रकात नमूद करून नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी केलेले कार्य राजकारणावर घर चालणाऱ्या लोकांना पाहवत नसल्याची टीकाही कुडाळकर यानी केली आहे
