चिपी विमानतळाचे यश काँग्रेसचेच

जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांचा दावा : महाविकासाच्या माध्यमातून काम पूर्ण

*⚡मालवण ता.१६-:* गेल्या पंधरा वर्षांपासून नियोजित व आज प्रगतीपथावर असलेले चिपी विमानतळ होण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनेच प्रयत्न केले होते. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या केंद्रातील काँग्रेस सरकारने दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील तत्कालीन युती सरकारच्या काही नेत्यांनी व सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी आजी माजी मंत्र्यांनी आपापल्या हेव्यादाव्यात विमानतळाचा विकास ताटकळत ठेवला. परंतु राज्यात काँग्रेसच्या समनव्यातुन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर उर्वरित कामासाठी वाढीव निधी देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून हे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे चिपी विमानतळ हे काँग्रेसचेच यश असल्याचा दावा युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने व गोवा विमानतळाला एकमेव पर्याय म्हणून चिपी हा विमानतळ तत्कालीन कॉंग्रेस सरकारनेच जागा निश्चिती करत व त्रुटी दूर करत आवश्यक परवानग्या दिल्या होत्या. चिपी विमानतळ उभारणीसाठी एका कंपनीला नेमण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील तत्कालीन युती सरकारच्या काही नेत्यांनी व सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी आजी माजी मंत्री महोदयांनी आपापल्या मतमतांतरात हेव्यादाव्यात या विमानतळाचा विकास ताटकळत ठेवला होता. आपापल्या सोयी तारखा ठरवत त्यानुसार तिथे खाजगी विमान आणून एकेदिवशीय कार्यक्रम करून या जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा भंग केल्या होत्या. याचा निषेध म्हणूनच दोन वर्षा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून कागदी व खेळण्यातील विमान उडवून आम्ही निषेध व्यक्त केला होता, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे. विमानतळ ठिकाणी लाईट, पाणी व रस्ते पूरक स्वरूपात पोहचले नसून अजून काही महिने या साठी वाट पहावी लागणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक निधी विद्यमान बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी दिलेला असून मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग याकामी कटाक्षाने लक्ष असून रस्ता रुंदीकरण साठी प्राधान्य देत आहेत, असे मोंडकर यांनी म्हटले आहे. सध्या या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा पूर्ण स्वरूपात होण्यासाठी अजून किमान एक वर्ष तरी लागणार असून या ठिकाणी कुडाळ हुन कवटी मार्गे जाणारा रस्ता देखील लवकरच रुंदीकरण करण्यासाठी घेण्यात येणार आहे त्याच प्रमाणे वेंगुर्ले हुन येणारा रस्ता हा पाट- परुळे व काही भागात अरुंद असून त्यांचा ही विस्तार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ होणं गरजेचे असल्याने भविष्यात देखील काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातील नागरिकांसोबत विकासासाठी उभा आहे. सध्या या विमानतळ उदघाटन बाबतच्या सर्व चर्चा या फक्त आपापसतील हेवेदावे दिखावा म्हणून न राहता यावर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन कायम स्वरूपात तोडगा काढून या ठिकाणी दररोज विमान उड्डाण व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत व त्यासाठी लागणाऱ्या सुविधा देखील तत्काळ पुरविण्या साठी प्रयत्न करायला हवेत. विमानतळ देखभाल करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग भरती केला जाईल, त्यात जिल्ह्यातील स्थानिक युवकांना देखील प्राधान्य देण्यात यावे यासाठी संबंधित कंपनीला युवक काँग्रेसतर्फे पत्र देखील दिले आहे, असेही अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page