विलवडेतील पुरग्रस्ताना मनसेकडून मदत

*⚡सावंतवाडी ता.१४-:* विलवडे येथे आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबांना आज मनसे कडून मदत करण्यात आली आहे. यासाठी मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार आणि कार्याध्यक्ष संतोष भैरवकर व विलवडे शाखा अध्यक्ष श्रीराम सावंत यांच्या माध्यमातून हे मदतकार्य करण्यात आले आहे.माजी आमदार परशुराम उपरकर व दिपक गुराम यांच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले.

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत लक्ष्मीकांत हरमलकर गोविंद मोरये यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page