कणकवली पोलिसांनी गुटखा वाहतुकीचा पोलखोल केला
*⚡कणकवली ता.१४-:* मुंबई गोवा महामार्गावरील तरेळे ते राजापूर अशी एका टेम्पोतुन गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्या नुसार कणकवली पोलिसांनी सापळा रचून या गुटखा वाहतुकीचा पोलखोल केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुमारे दीड लाखाचा गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 3 लाख असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. सोमवारी खारेपाटण चेकपोस्ट येथे कणकवली पोलिसांच्या पथकाने ही करवाई केली. कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, उद्धव साबळे, वैभव कोळी आदीच्या पोलीस पथकाने सोमवारी दुपारी 3 वा च्या सुमारास ही कारवाई केली. संशयित आरोपी प्रकाश निरंकारी (35, कोल्हापूर – गांधीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात अजून कुणाचा सहभाग आहे, हा गुटखा कुणाला विकला जातो याची माहिती पोलीस घेत आहेत.
