कॉंग्रेस कडून ग्रामकमिटी अध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली नियुक्ती
*💫सावंतवाडी दि.१८-:* ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून मास्टर स्टोक खेळण्यात आला असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मळगाव ग्रामकमिटी अध्यक्षपदी पांडुरंग नाटेकर यांची नियुक्ती सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र आज त्यानी पांडुरंग नाटेकर यांना दिले आहे.
