*💫सिंधुदुर्गनगरी,दि..१८-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार २० डिसेंबर २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, १०.०० वा. बाजारपेठ, कुडाळ येथे संजय पडते, शिवसेना जिल्हा प्रमुख, सिंधुदुर्ग यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी १०.३० वा. कुडाळ येथून मोटारीने मळगांव, ता. सावंतवाडीकडे प्रयाण, सकाळी ११.०० ते १२.०० वा. पर्यंत शालु मंगल कार्यालय, मळगांव, ता. सावंतवाडी येथे सावंतवाडी- वेंगुर्ला – दोडामार्ग गट बैठक, दुपारी १२.०० वा. मळगांव, ता. सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी १२.३० ते १.३० वा. पर्यंत महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे कुडाळ – मालवण गट बैठक, दुपारी २.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोरोना आजार संदर्भात आढावा बैठक, दुपारी ३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषद, सायं, ५.०० वा ते ६.३० वा. पर्यंत विजय भवन, कणकवली येथे कणकवली-देवगड-वैभववाडी गट बैठक, सायं. ६.३० नंतर राखीव. रात्री ७.४५ वा. मोटारीने कणकवली रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्री ८.१५ वा. कणकवली रेल्वे स्थानक येथून मडगांव – मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
पालकमंत्री उदय सामंत रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…
