*⚡मालवण ता.०५-:* नांदोस मधील अंकुश माधव मेस्त्री यांच्या घरावर वीज पडून घराच्या पत्र्यांचं नुकसान झाले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे मेस्त्री कुटुंब चिंतेत होते. याबाबतची माहिती मिळताच नांदोस शिवसेनचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंजनकर आणि विभागप्रमुख विजय पालन यांनी तात्काळ घराची पाहणी करत शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरावा केला. पंकज वर्दम यांनी दखल घेत या दाम्पत्याला मदत मिळवून दिली आहे. तळागाळातील लोकांना शिवसेना नेहमी आधार देते आणि देत राहणार, असे यावेळी पंकज वर्दम यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप हनजनकर, विभाग प्रमुख प्रमुख राजू गावडे, उपशाखाप्रमुख विकी चव्हाण आदी युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वीज पडून घराचे नुकसान झालेल्या कुटुंबाला युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी दिला मदतीचा हात
