संपदा परब प्रथम तर भक्ती वायंगणकर द्वितीय
*⚡कणकवली ता.०४-:* युवक कल्याण संघ संचलित , विजयराव नाईक बी . फार्मसी कॉलेज , शिरवल महाविद्यालयाचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हार्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्याक हिवाळी परीक्षेचा प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष डिग्रीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेमधील प्रथम वर्षातील संपदा परब ( ९ .८२ ) , भक्ती वायंगणकर ( ९ .७८ ) व मिताली पिळणकर ( ९ .६२ ) गुण मिळवून यांनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे . तर द्वितीय वर्षातील प्रांजल घाडीगावकर आणि प्रमदा नाईक यांनी ( ९ .६७ ) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे . तसेच दिक्षा देटे ( ९ .५० ) व पुर्वा गुरव ( ९ .४२ ) गुण मिळवून यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे . तसेच विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक , उपाध्यक्षा . सौ .स्नेहा नाईक , सचिव डॉ. रमण बाणे , खजिनदार मंदार सावंत , प्राचार्य पुजा पटेल , बी . फार्मसी विभाग प्रमुख प्रा .अमर कुलकर्णी व डी . फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर , प्रा. मेघा बाणे , प्रा .ऋषीकेश काटकर , प्रा .श्वेता पाटील , प्रा . निशा करंदीकर , प्रा . नमिता सागवेकर , प्रा . प्रणिता चव्हाण सर्व शिक्षकवृंद कौतुक केले .
