*⚡दोडामार्ग ता.०३ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील चोरट्या दारुच्या विरोधात आखलेल्या मोहीमेला दोडामार्ग पोलिसांना पुन्हा एकदा यश आले. आज सकाळी महेंद्रा बोलेरो जीप भरलेली गोवा बनावटीची दारु दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर. जी नदाफ यांनी योग्य सापळा रचून विजघर चेकपोस्ट येथे जप्त केली. यावेळी बोलेरो जीपसह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून इतर चौकशी सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी केली आहे.
दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्या दारूवर पोलिसांची कारवाई
