रेल्वे स्टेशन, आंबोली घाट व गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी

सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले आवाहन

*⚡सावंतवाडी ता.०२-:* गौरी गणपती सणाला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे मत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशन, आंबोली घाट आणि गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. सावंतवाडी तालुका शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात झाली यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, नायब तहसीलदार मनोज मुसळे, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, बांदा पोलीस निरीक्षक श्री अनिल जाधव, उपनिरीक्षक समीर भोसले,बांधकाम उपअभियंता अनिल आवटी आदी उपस्थित होते. गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन, एसटी विभाग, बांधकाम विभाग, दूरसंचार, आरोग्य विभाग अशा सर्व विभागांचा आढावा घेतल्यानंतर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले, गौरी-गणपती सणानिमित्ताने चाकरमानी मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे सर्व विभागांनी खबरदारी घ्यावी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावेत. आंबोली येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच आंबोली घाटात धुक्याची काळजी घेताना रिप्लेक्टर लावले जावेत. तसेच बांधकाम आणि वनखात्याने खबरदारी घेताना वृक्ष उन्मळून कोसळल्यावर ते तात्काळ दूर करावे. आंबोली घाट या प्रमाणेच इन्सुली मळगाव घाटात देखील खबरदारी घ्यावी असे यावेळी निर्देश प्रांताधिकारी खांडेकर यांनी दिले. गणेश चतुर्थी सणामुळे वीज खंडित होणार नाही याची खबरदारी वीज मंडळाने घ्यावी तसेच वायरमन, ग्रामसेवकांनी मुख्यालयामध्ये राहून गणेश भक्तांची सेवा करावी. वीज मंडळाने वीज सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. बीएसएनएल कंपनीने ग्राहकांना सेवा सुरळीत देण्यासाठी प्रयत्न करावेत.एसटी महामंडळाने रेल्वेने येणाऱ्या भक्तांसाठी खास एसटी बसेसची सोय ठेवावी तसेच गणेश चतुर्थीच्या काळामध्ये मळगाव ते बांदा अशी बस सोडून गणेशभक्तांची सेवा करावी तसेच रेल्वे येण्याचे वेळापत्रक पाहून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे एसटी विभागाने पाहावे असे निर्देश देखील प्रांताधिकारी खांडेकर यांनी दिले. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवताना रस्त्याच्या साईडला असणारी झाडी देखील छाटावी आणि स्वच्छता राखावी तसेच आरोग्य विभागाने खबरदारी घेताना आंबोली बस स्थानक आणि मळगाव रेल्वे स्टेशनवर आरोग्य तपासणी करण्यासाठी तीन ते चार पथके ठेवली जाणार आहेत असे खांडेकर यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर आरोग्य विभाग नियमाप्रमाणे तजवीज करेल असे ते म्हणाले गणेश भक्तांना आरटीसीपीआर किंवा दोन डोस घेतलेल्या सवलत देण्यात आली आहे. पोलिसांनी गर्दी आणि विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील पाहावे असे ते म्हणाले झाराप तिच्यावर येणाऱ्या बसेस सावंतवाडीतील प्रवासी घेऊन येतील,त्या सावंतवाडी शहरातून याव्यात असे पोलिसांनी पहावे असे देखील निर्देश देण्यात आले. यावेळी तहसीलदार राजाराम मात्रे यांनी आरोग्य विभाग, वीज मंडळ, वनखाते, बांधकाम खाते, नगरपरिषद, एसटी विभाग अशा सर्व विभागानी गणेशभक्त प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी तजवीज ठेवावी असे आवाहन यावेळी केले यावेळी बांदा ते दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची देखील मागणी करण्यात आली यावेळी अशोक दळवी, अन्वर खान, प्रा. सुरेश गोवेकर,प्रा. एमडी मोरबाळे, अभिमन्यू लोंढे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अँड अनिल केसरकर सुधीर घुमे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी गजानन परब, गुरुदास पेडणेकर, साबाजी नार्वेकर, मधुकर मातोंडकर, वासुदेव जाधव, सिद्धार्थ माळकर आदींनी उपस्थिती दर्शवली होती.

You cannot copy content of this page