रेवंडी ग्रामस्थांच्यावतीने संविता आश्रमला मदतीचा हात

रोख रक्कमेसह तांदूळ, गहू, कपडे, खाऊ व अन्य साहित्य भेट

*⚡मालवण ता.०२-:* रेवंडी ग्रामस्थांच्या वतीने कुडाळ येथील संविता आश्रमला रोख ३५ हजार रूपये तसेच ४५० किलो तांदूळ, २५० किलो गहू तसेच कपडे, खाऊ देण्यात आले. संविता आश्रमच्या संस्था चालकांकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. यामध्ये अन्नदनासाठी रेवंडी येथील भद्रकाली देवस्थान कमिटीचे सहकार्य लाभले. तर सामान वाहतुकीसाठी सचिन मोर्वेकर, तुषार केणी, प्रितेश मयेकर यांनी मोफत वाहनांची सोय केली. यावेळी अजित कांबळी, अर्जुन वराडकर, रवींद्र कांबळी, अरुण कांबळी, विजय कांबळी, विकास चेंदवणकर, नरेश करलकर, शशांक तळाशीलकर, अमोल वस्त, किशोर कांबळी, युवराज कांबळी, सचिन मोर्वेकर, सौ. सुषमा मयेकर, नेहा करलकर, कृतिका कांबळी, सोनाली तळाशीलकर, प्रज्वला चेंदवणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page