*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी अक्षय दुर्गानंद करंबेळकर (२५) यांचे गुरुवारी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस अक्षय याला प्रकृती अस्वस्थामुळे सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेले १० दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.कणकवलीचे ग्राम पुरोहित दुर्गानंद करंबेळकर यांचा तो मुलगा होय. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, काका, काकी असा परिवार आहे.
कणकवलीत येथील अक्षय करंबेळकर यांचे निधन
