जिल्हा क्रिकेट निवड चाचणी सत्रात एम अकॅदमीची यशस्वी वाटचाल

अकॅदमीच्या तब्बल २४ क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड

*⚡सांवतवाडी ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोशिएशनद्वारे रविवारी घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील जिल्हा क्रिकेट निवड चाचणी सत्रात सावंतवाडी येथील एम अकॅदमीने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असून या अकॅदमीच्या तब्बल २४ क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६५ खेळाडू या निवड चाचणी सत्रात सहभागी होते. त्यापैकी ४० जणांची निवड झाली.यात एम अकॅडमीच्या २८ क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. यापैकी २४ जणांची निवड झाली. या निवड चाचणी सत्रात रेहान शहा, अरीत डिंगणकर, रघुवीर सातोसकर, सोहम पावसकर, संकल्प दळवी, प्रज्ञेश रेगे, साजिल खतीब, मंथन नाईक, आर्यन दुधवाडकर, पराग आराबेकर, मंथन कांबळी, सुजल कोरगावकर, मानस कोरगावकर, अथर्व तोरसकर, ऋषी लेले, इशांत कुबडे, आर्यन गगनग्रास, रितेश धामापूरकर, रुद्रेश कर्णिक, पार्थ नर, यश कंगराळकर, गौरांग बिडये, नीरज जाधव, राहुल नेवगी यांचा समावेश आहे. या मुलांना अकॅदमीचे राहुल रेगे, निल रेगे, पीटर सर, झँकरीन आल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे अकॅदमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page