जोरदार स्वागत करणार;तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर
*⚡मालवण ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी मालवण तालुक्यात दाखल होणार असून दुपारी दोन वाजता आचरा येथे या यात्रेचे भव्य स्वागत मालवण तालुका भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा २८ रोजी आचऱ्यामध्ये दुपारी २ वाजता दाखल झाल्यानंतर ही यात्रा दुपारी पावणे तीन च्या सुमारास मालवण शहरात दाखल होईल. मालवण शहरात भरड नाका येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करून बाजार पेठ मधून फोवकांडा पिंपळ मार्गे करून ही यात्रा कुंभारमाठ येथे ३.३० वाजता दाखल होईल. कुंभारमाठ येथे स्वागत केल्यानंतर यात्रा चौके येथे ३.४० वा. पोहोचणार असून चौके मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागत होणार आहे. तेथून कट्टा येथे ४ वाजता या यात्रेचं भव्य स्वागत करण्यात येईल. या यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यासाठी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यानी आपली ताकद लावावी असे आवाहन धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.
