कारवाई कायदेशीर:राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे
*⚡सावंतवाडी ता.२६-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके मागे राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमात्र संबंध नसून, कोणत्याही नेत्याने अटक करण्यास सांगितले म्हणून कोणालाही अशाप्रकारे अटक होत नाही. कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो त्यामुळे ती पोलिसांनी केलेली कारवाई आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृह खाते चांगल्या प्रकारे काम करत आहे. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,काका कुडाळकर,तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, अशोक पवार, रतन भाऊ कदम, शहराध्यक्षपदी देवा टेंमकर,शैलेश लाड आदी होते
