केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे स्वागतासाठी कणकवलीत रोषणाई

राणेंच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष समीर नलावडेंची टीम सज्ज

*⚡कणकवली ता.२६-:* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्यानिमित्ताने प्रथमच मायभूमी कणकवलीत आगमन होत आहे. केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या स्वागतासाठी कणकवली नगरी सज्ज झाली असून कणकवली शहरात जणू दिवाळी दसरा असल्यासारखेच भासत आहे. राणेंच्या स्वागतासाठी शहरात हायवेलगत सर्व्हिस रोडच्या दुतर्फा गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. पटवर्धन चौक तसेच महत्वाच्या ठिकाणी आकाशकंदील लावण्यात आले आहेत. तर दिव्यांच्या रोषणाईने सगळे कणकवली शहर उजळून निघाले आहे. केंद्रीयमंत्री राणेंच्या स्वागतासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या टीमने आणि कणकवली शहर भाजपाने अगदी कंबर कसली असून शहरात दिवाळी दसरा सण असल्यासारखे वातावरण निर्मिती झाली आहे. राणेंच्या स्वागताचे आकर्षक बॅनर लक्ष वेधुन घेत आहेत. ढोल पथकांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करून न भूतो असे राणेंचे स्वागत केले जाणार आहे. कणकवली शहरात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पटवर्धन चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री राणे स्वागत स्वीकारणार असून आपल्या होमपीचवर जनतेचे आशीर्वाद घेत त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचा आजवरच्या राजकीय प्रवासाची स्पेशल डॉक्युमेंटरी एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. त्याच दरम्यान कोकणची लोककला असलेल्या धनगरी समाजाचे गजा नृत्य, दशावतारी नाटकाची स्किटही सादर करून केंद्रीयमंत्री राणेंना मानवंदना दिली जाणार आहे. एकंदरीत केंद्रीय उद्योगमंत्री राणेंच्या न भूतो अशा स्वागतासाठी कणकवली नगरी सज्ज झाली आहे.

You cannot copy content of this page