भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद
*⚡वेंगुर्ले ता.२५-:* केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी राणे साहेबांचा विजय असो , भारतीय जनता पार्टीचा विजय असो , आघाडी सरकारचा निषेध असो , ठाकरे सरकार हाय हाय , राणे साहेब आगे बढो – हम तुम्हारे साथ है , भारत माता की जय अशा घोषणा देत आसमंत दुमदुमला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल – बाळा सावंत , युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक – संतोष गावडे – लक्ष्मीकांत कर्पे , नगरसेविका शितल आंगचेकर व ईशा मोंडकर , ता.चिटनीस समीर चिंदरकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे – जगंन्नाथ राणे – कमलेश गावडे , तुळस सरपंच शंकर घारे , परबवाडा सरपंच पपु परब ,शिरोडा उपसरपंच राहुल गावडे , विभागीय अध्यक्ष अमित गावडे , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , युवा मोर्चा चे संदीप पाटील – प्रणव वायंगणकर – भुषण सारंग – संदीप तांडेल , तेजस मोबारकर – पुंडलिक हळदणकर – विशाल जाधव – निलय नाईक – राहुल मोर्डेकर – प्रदिप मठकर – सागर राणे – साईप्रसाद भोई , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , कीशोर परब, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , ओंकार चव्हाण , दिवाकर कुर्लै , गजानन कुबल इत्यादी उपस्थित होते .
