*⚡कणकवली दि.२२-:* हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. अशाच भावनेतून कणकवली येथे पोलिसांना राखी बांधत शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ.नीलम सावंत- पालव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. कणकवली पोलीस ठाण्यात शिवसेना महिला कणकवली शहरप्रमुख साक्षी आमडोस्कर, महिला विभाग प्रमुख संजना कोलते , वैदेही गुडेकर , शाखा प्रमुख संजना साटम , दिव्या साळसकर , रोहिणी पिळणकर ,गौरी कांबळे , सायली धुत्रे ,माधवी दळवी,अमिता सावंत, सुजाता पवार, इशिका पवार, रितिका पवार यांनी पोलीस बांधवांना राखी बांधल्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल कणकवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत भावाच्या कर्तुत्वाला पोलीस नेहमीच जागतीलअसे सांगितले.
शिवसेना महिला आघाडीच्यावतीने पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधन केले साजरे
