इनरव्हील क्लब वेंगुर्लेने जपली सामाजिक बांधिलकी

जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य व सॅनिटरी नॅपकिनचे केले वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी- इनरव्हील क्लब वेंगुर्लातर्फे सामाजिक बांधिलकी जपताना डिस्ट्रीक्ट चेअरमन रत्ना बेहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तर मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव स्मिता दामले, उपाध्यक्षा डॉ.अफशान कौरी, आय.एस.ओ.वृंदा गवंडळकर, डॉ.पूजा कर्पे, श्रीया परब, आरती गिरप, माजी अध्यक्षा गौरी मराठे आदी उपस्थित होते. कोविड काळात विनामोबदला काम केलेल्या झेड.आर.आर.डॉ.स्वप्निल परब व रोटरॅक्ट अध्यक्ष दुर्गेश पाटील यांचा ‘कोविड योद्धा‘ म्हणून सत्कार करण्यात आला. दरम्यान, ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथीक कॉलेजच्या मुलांनी भगतसिग, सुखदेव व राजगुरु यांच्या देशभक्ती व समर्पणावर नाटीका तसेच देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. डिस्ट्रीक्ट चेअरमन रत्ना बेहरे यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page