लाईफटाईम हॉस्पिटल पडवेतर्फे राजापूर वासियांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

*⚡कणकवली ता.१७-:* एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवेतर्फे १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी 2 वाजेपर्यंत जोशी हॉस्पिटल राजापूर येथे भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये डॉ. गोपाळ चिगळे (एम.बी.बी.एस., एम. डी. मेडिसिन) हे तज्ञ डॉक्टर आपली आरोग्य सेवा बजावणार असून यामध्ये मोफत रुग्णतपासणी निदान व सल्ला, ई.सी.जी. यांचा समावेश आहे. एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल तर्फे नेहमीच जनसेवेसाठी अनेक मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून सदर मोफत शिबिराचा राजापूर आणि सर्व शेजारील तालुकावासीयांनी लाभ घ्यावा. रुग्णालय संदर्भीय इतर सर्व माहितीसाठी रुग्णालय रिसेप्शन क्रमांक ०२३६७-२३४००० / ९५१८३०६२२३ सौ. दुर्वा गंगावणे ९३७००५६०७६, अरविंद कुडतरकर ९३२५२३२५६२, हरिश्चंद्र परब ९५७९९९७२०३ अनिल कुडपकर ९४२०९०७६६१. यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page