सावंतवाडीचा आठवडा बाजार पुन्हा मोती तलावाच्याकाठी भरला

*⚡सावंतवाडी ता.१७ प्रसन्न गोंदावळे-:* राज्य शासनाने बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सुरू ठेवण्यात मुभा दिल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सावंतवाडीचा आठवडा बाजार आजपासून मोती तलावाच्या काठी पुन्हा भरविण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य शासनाने कडक नियमावली जाहीर केली होती. यात सुरुवातीला बाजारपेठ सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव थोडासा कमी झाल्याने या वेळेत बदल करून सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत होती. मात्र आता राज्य शासनाने बाजारपेठ सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत सुरू ठेवण्यात मुभा दिली आहे. त्यामुळे बंद असलेली सावंतवाडी बाजारपेठ आजपासून सुरू करण्यात आली आहे. मोतीतलावाच्या काठी बाजार भरविण्यात आला आहे. या निर्णयाने व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page