*⚡कणकवली ता.१६-:* माजी पंतप्रधान तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्ह्यध्यक्ष राजन तेली,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष कमलाकांत उर्फ बाळू कुबल,महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण ,कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री,पप्पू पुजारे, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशिर परुळेकर, तालुका कार्यकारिणी सदस्य प्रदिप गावडे, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, आबा कोरगावकर उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हा कार्यालय प्रतिमेला पुष्पहार अर्पण
