स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजन*
*⚡वेंगुर्ला ता.१६-:* स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मित्र निवड व प्राचीन वृक्षांचे संवर्धन करणा-या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, विधाता सावंत, कृपा गिरप, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, पूनम जाधव, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते. शहरातील आठ प्रभागात प्रत्येकी एक याप्रमाणे स्वच्छता मित्र म्हणून नियुक्त केलेल्या संजय पुनाळेकर, अमेय धुरी, महेंद्र धुरी, श्रीकांत रानडे, बाबी रेडकर, शरद मेस्त्री, वासुदेव परब, चंद्रकांत जाधव यांना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘माझी वसुंधरा प्राचीन वृक्ष संवर्धन‘ मोहिमेंतर्गत ५० वर्षाहून प्राचिन वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करुन वेंगुर्ला शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी मोलाचे योगदान देणारे माजी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांना ‘वृक्षमित्र‘ म्हणून सन्मानित करुन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
