तळाशील बंधारा व कळणे येथे मायनिग आंदोलनास पाठींबा देत सहभागी होणार

पर्यावरणप्रेमी रविकिरण तोरसकर यांनी मांडली भूमिका

*⚡मालवण ता.१४-:* तळाशील येथील बंधाऱ्याच्या प्रश्नी तसेच कळणे येथे मायनिगच्या विरोधात उद्या होत असलेल्या आंदोलनात राजकीय पादत्राणे दूर ठेऊन पाठींबा देत सहभागी होणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता रविकिरण तोरसकर यांनी दिली. तळाशील गावास सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी बंधारा व्हावा या मागणीसाठी तळाशीलवासियांनी उद्या उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर कळणे येथे मायनिंगच्या विरोधात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता रविकिरण तोरसकर यांनी तळाशील, कळणे वासीयांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे श्री. तोरसकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page