*⚡देवगड ता.१४-:* पुरळ गावातील प्रतिष्ठित नागरिक ,देवगड पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ रघुनाथ घाडी (57) यांचे शनिवारी दुपारी 2 वा. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे.पुरळ विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन , देवगड तालुका भाजपचे माजी सरचिटणीस, पुरळ ग्रा.पं.माजी उपसरपंच अशी अनेक भूषविली होती.देवगड तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रही उत्तमरीत्या सांभाळीत होते.त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ घाडी यांचे निधन
