*⚡सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात माठेवाडा आणि सालईवाडा येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात मळगाव २, रोनापाल १, बांदा १, नेमळे ४, डीगणे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १८५ रुग्ण सक्रिय आहेत.
