*अपघातात दुचाकीस्वाराचा झाला होता मृत्यू
कुडाळ : हयगयीने व अविचाराने डंपर रिव्हर्स घेतल्याने वाडीवरवडे येथील मोटर सायकल डंपर यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी डंपर चालक रविंद्र तुकाराम सावंत वेतोरे गोसावीमठ याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीवऱवडे येथे डंपर रिव्हर्स घेत असताना मोटर सायकलची धडक बसून मोटरसायकल स्वार समीर सहदेव गावडे ३० रा वेतोरे पालकर याचा मृत्यू झाला होता. या अपघातात डंपरचालक रविंद्र सावंत याने डंपर रिव्हर्स घेत असताना रस्त्याच्या मध्यभागी आला. यावेळी मोटरसायकलने येत असलेल्या समीरच्या मोटर सायकलला डंपरची धडक बसली. यामध्ये रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व अविचाराने डंपर रिव्हर्स घेतला व यावेळी मोटरसायकलची डंपरला ठोकर बसली व त्यानंतर या अपघातात समिर गावडे याचा मृत्यू झाला अशी फिर्याद सुनिल लक्ष्मण आळवे यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. यावरून डंपर चालक रविंद्र तुकाराम सावंत यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.