सर्व धर्मवासीय घेतात दर्शन;हिदायतुल्ला खान यांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.१४-:* सर्व धर्म समभाव व एकजूट दाखवणारा सण म्हणजे मोहरम असून, या सणांची सावंतवाडी शहरात शांततेत सुरुवात झाली आहे. शहरात एकूण ७ ठिकाणी मोहरम सण साजरा केला जातो. १० दिवस चालणाऱ्या या सणाच्या कालावधीत शहरासह तालुक्यातील सर्व धर्माचे नागरिक दर्शनासाठी येतात. अशी माहिती हिदायतुल्ला खान यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून अगदी साध्या पद्धतीत हा सण साजरा केला जात आहे. शहरात सालईवाडा येथे सरदार निंबाळकर पिर, बाहेरचावाडा जलाल शहा पीर, होळीचा खुंट जुना बाझार तहसीलदार पीर आणि सय्यद पीर, माठेवाडा पटवी पीर, आणि काझीचे पिर, गर्डी माथाचे पीर असे एकूण सात ठिकाणी ताबूत व पटवे स्थापित करण्यात येतात. पिराचे मुजावर शब्बीर शेख, अन्वर शहा, जावेद शेख, शौकत बेग, रमजान शेख, दादा पडवेकर, नाजिम पटेल, जावेद शेख यांच्या सह मुस्लिम समाजातील व सर्व धर्मातील बांधव एकत्रित येऊन मोहरम साजरा करतात अशी माहिती हिदायतुल्ला खान यांनी दिली आहे.
