*⚡कणकवली दि.११-:* गणेश चतुर्थीला अद्यापही महिनाभर अवधी असताना मंडपी/माटवीच्या सजावटीसाठी लागणारी जंगलातील कवंडाळे आणि कांगला यंदा लवकरच पिकू लागली आहेत. त्यामुळे यंदा गणेश चतुर्थीला या दोन्ही वनस्पतीच्या फळांचा तुटवडे जाणवणार आहे.यंदा महिनाभर आदीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे यंदा कवंठाळ या पानवेलीला आणि कांगलाच्या झाडांना लवकर बहर आला. त्यातच यंदा गणेश चतुर्थी वीसेक दिवस उशीरा आली आहे. कवंडाळे लवकर पिकायला लागल्याने ती गळू लागली आहेत. कणकवलीतील पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांच्या घराच्या परस बागेत पक्षांच्या विष्टेद्वारे पडलेल्या बियांमुळे तीन वेल वाढले आहेत. आज या वेलांच्या खाली पिकून पडलेल्या या फळाची रास दिसत आहे. जंगलातील फळे अशीच पिकून पडत आहेत. वास्तविक आयुर्वेदिकद्दष्टा या फळाचे काही औषधी गुणधर्म आहेत. मात्र ते लोकांपर्यंत पोचलेले नाहीत. कांगलाची झाडे प्रामुख्याने जंगलात आढळतात. ही कांगले पिकून जमीनीवर पडत आहेत. त्याच्यातही औषधी गुणधर्म आहेत. मात्र या दोन्हीही वनस्पतीची फळे अशाच प्रकारे पिकून गळू लागल्यास माटवीसाठी तुटवडा नक्कीच भासणार आहे.
यंदा कवंडाळे-कांगला गणपती आधीच पिकू लागली
