स्वराज्य ग्रुप तर्फे असलदे येथील वृध्दाश्रमला विविध पदार्थांचे वाटप

*💫कणकवली दि.१४-:* स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग च्या वतीने आज कणकवली तालूक्यातील स्वस्तीक फाउंडेशनचे दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथील वृध्द व्यक्तींना विविध खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले .यात सामोसे ,ढोकला ,बिस्कीट यांचा समावेश आहे .        कणकवली तालूक्यातील युवकांनी एकत्र येत स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग ची स्थापना केली .या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्याची सुरूवात असलदे ता.कणकवली येथील दिवीजा वृध्दाश्रमच्या आजी आजोबांना विविध खाद्य पदार्थांचे वाटप करून संस्थेच्या उपक्रमांना सुरूवात करण्यात आली .असे अनेक उपक्रम राबविले जाणार असून जिल्हयातील युवकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे .वृध्दाश्रमातील असलेल्या आजी आजोबांनी या संस्थेचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी आर्शिवाद देवून शुभेच्छा दिल्या .      यावेळी स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग या संस्थेचे प्रसाद सुखटनकर ,तोसीम नावेलकर ,किरण मालपेकर ,माधव सावंत ,विनायक परब ,योगश घाडीगावकर ,बाळकृष्ण भागवत तसेच स्वस्तीक फाउंडेशनचे दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथील संदेश शेटये, दीपीका रांबाडे उपस्थीत होते.

You cannot copy content of this page