*वेतोरे येथील अपघातात युवक जागीच ठार…

कुडाळ : वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडी वरवडे गोवेरी फाटा येथे मोटर सायकल व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात वेतोरे पालकरवाडी समीर सहदेव गावडे (३०) हा ठार झाला. ही घटना ७.१५ वा च्या सुमारास घडला. वाडीवरवडे येथील गोवेरी फाटा येथे आतील रस्तावर असलेला डंपर चालक डंपर मागे घेऊन रस्तावर आणत होता. यावेळी समिर गावडे याने डंपरच्या मागिल हौद्याला जोरदार ठोकर दिली. या अपघातांनंतर तेथून जात असलेले वेतोरे सरपंच संदिप चिचकर हे आपल्या चारचाकी वाहनातून जात होते. त्यांनी त्याला तात्काळ आपल्या वाहनातून कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मग उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले.

You cannot copy content of this page