पूर्णवेळ अधिकारी देण्याची अनिल चव्हाण यांनी केली मागणी
*⚡आंबोली दि.०९-:* सार्वजनिक बांधकाम विभागाने एका सुपरवायझर कडे तीन शाखा अभियंत्यांच्या कामाचा चार्ज देखरेखीसाठी दिला आहे.आंबोली घाट असल्याने या ठिकाणी आधी पूर्णवेळ सूपरवायझर होता. मात्र शाखा अभियंत्यांचे तालुक्यातील काम एका व्यक्तीवर ढकलून सुशेगाद आहेत.वास्तविक त्यांनी या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी देणे आवश्यक आहे. ठेकेदारांच्या स्वाधीन त्यांनी सगळे केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांच्या गराड्यात असतो. आंबोली घाट देखील वाटणी करून दिला आहे. त्यामुळे कामगार भरती देखील होत नाही.ठेकेदार सांगणार आणि अधिकारी ऐकणार तेवढेच काम करणार.ही वस्तुस्थिती बदलणे गरजेचे आहे. या ठिकाणी एक पूर्णवेळ अधिकारी देण्यात यावा. तसेच घाटातील खड्डे तत्काळ बुजवावे.अशी मागणी आंबोली येथील अनिल चव्हाण यांनी केली आहे.
