मालवण तालुक्यातील कातवड प्राथमिक शाळेमध्ये बुधवारी 11 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2:30 वाजता तालुकास्तरिय रानभाज्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांचे हस्ते होणार आहे तसेच सदर कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे प्राध्यापक उपस्थित राहून रानभाज्या संवर्धन व औषधी गुणधर्म यावर मार्गदर्शन करणार आहेत तरी मालवण तालुक्यातील नागरिकांनी रानभाज्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ठेवण्यासाठी रानभाज्या आणाव्यात यासाठी कृषी सहाय्यक डी डी गावडे, ग्रामसेवक श्रीमती चव्हाण, डाटा ऑपरेटर दिशा चव्हाण, शेतीमित्र प्रभाकर सावंत, शिवराम चव्हाण, काशीनाथ चव्हाण, गणेश चव्हाण,भाग्यश्री चव्हाण, सुजय घाडी, वैभव नाईक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण कातवड येथे ११ रोजी रानभाज्या प्रदर्शन
