पणदूर जितवणे येथील पोल्ट्रीतील ६५ कोंबडी फस्त

पहाटे जंगली प्राण्याचा प्रताप; धाकू सावंत यांचे हजारोंचे नुकसान

*⚡कुडाळ ता.०७-:* पणदूर, जितवणे येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांच्या घरगुती पोल्ट्री मधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे 60 ते 65 कोंबड्या काल पहाटे वाघेटी सदृश जंगली जनावराने फस्त केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पणदूर, जितवणे येथील धाकू शंकर सावंत हे गरीब शेतकरी असून त्यांनी आपल्या घरालगत छोटी घरगुती पोल्ट्री शेड उभी केली आहे. सुमारे 4 महिन्यांपूर्वी गावठी कोंबड्यांची सुमारे 150 पिल्ले बाळगली होती. त्यातील काही पिल्ले पहिल्या महिन्यातच अज्ञात रोगाने दगवल्या होत्या. उर्वरित कोंबड्याची त्यांनी व्यवस्थित जतन करत येत्या रविवारी  येणाऱ्या गटारी अमावस्येच्या निमित्ताने वाढीव विक्रीच्या निमित्ताने त्यांनी विक्री केल्या नव्हता. परंतु काल पहाटे 2 ते 5 वाजल्या दरम्यान वाघेटी सदृश्य जंगली जनावरांने पोल्ट्री शेडला लावलेल्या जाळीला असलेल्या फटीतुन आत शिरत आतील सर्व कोंबड्यांच्या डोक्याला चावा घेतल्याने पोल्ट्री शेड मधील सर्वच्या सर्व 60 कोंबड्यां मृत झाल्या आहेत. उद्या होणाऱ्या गटारी अमावास्येला या सर्व कोंबड्यांना सुमारे प्रति पक्षी सुमारे 400 ते 500 रुपये एवढा भाव मिळणार होता. त्यामुळे या गरीब शेतकऱ्यांचे सुमारे 30000/- रुपयांचे नुकसान झाले आहे. पणदूर सरपंच दादा साईल यांना ही घटना कळताच  घटना स्थळी धाव घेत वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, वनपाल दत्तगुरु पिळणकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत मूळे, पोलीस पाटील देऊ सावंत, उपसरपंच बबन पणदूरकर, माजी उपसरपंच आबा सावंत, वनरक्षक शिंदे, रामदास घुगे इ. बरोबर घेऊन पंचयादी पूर्ण केली.*

You cannot copy content of this page