आ दीपक केसरकर यांचा पुढाकार
*⚡सावंतवाडी ता.०७-:* शिवसेना आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने विलवडे गावातील पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे विलवडे ओटवणे वाफोली बांदा शेर्ले या गावांना महापुराचा फटका बसला होता लोकांच्या शेती बागायती तसेच दुकान घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच रावजी दळवी विभागप्रमुख आनंद दळवी उपविभाग प्रमुख मेहता गवस सामाजिक कार्यकर्ते सोनू दळी शाखाप्रमुख किशोर दळी बाळकृष्ण दळवी प्रकाश दळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
