कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे निवेदन ;संदीप कदम यांची मागणी
*⚡कणकवली दि.०६-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यातच उपस्थितीबाबत माध्यमिक शाळांची एकवाक्यता दिसत नसल्याने उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे . तरी माध्यमिक शाळांच्या शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट परिपत्रक काढुन संभ्रम दुर करावा अशी मागणी शिक्षणाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी संघटनेच्यावतीने केली आहे . शैक्षणिक वर्ष२०२१-२२ वर्षात शिक्षकांच्या शारीरिक उपस्थितीबाबत शासनाने कोविड-१९ प्रार्दूभावामूळे १४जून२०२१ रोजी परिपत्रक काढून इ.१ते ९, ११ वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी ५० % उपस्थित रहाण्या बाबत स्पष्ट सुचना आहेत . तसेच इ.१० , १२वी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी निकाल करून देणेसाठी ( मूल्यमापन करण्यासाठी ) १०० % उपस्थित राहण्यास आदेश दिले होते. आता दहावी बारावीचा निकाल लागला तरि सदर वर्गांना शिकवणारे शिक्षकांची शंभर टक्के उपस्थितीत रहाण्यासाठी मुख्याध्यापक सांगत आहेत . काही शाळांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती तर काही शाळांमध्ये शंभर टक्के उपस्थिती ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे . अनेक मोठ्या शाळांत उपस्थिती ची संख्या मोठी असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. शासन परिपत्रकात दहावी बारावीचा निकाल करून देणेसाठी शंभर टक्के उपस्थिती बाबतचे स्पष्ट आदेश आहेत . आता रिझल्ट करून दिल्या नंतर रिझल्ट लागला तरि सदर शिक्षकांना शंभरटक्के उपस्थित रहावे लागत आहे . तरि पुन्हा आता जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दि 04/01/2021काढलेल्या परिपत्रकानुसार दहावी बारावी च्या शिक्षकांची शंभरटक्के उपस्थित रहावयाचे की कसे या बाबत स्पष्ट आदेश निर्गमित करावेत .अशी मागणी केली आहे.
