तारकर्लीचे ग्रा. पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांचा आरोग्य अधिकारी यांना निवेदन
*⚡मालवण ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणा मधील ढिसाळ नियोजनामुळे बोजवारा उडाला आहे. तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत क्षेत्रातही कोविशील्ड लसीकरणाच्या दुसऱ्या डोसच्या थांगपत्ता नाही. यामुळे अनेकजण दुसऱ्या डोसपासून अजूनही वंचित राहिले आहेत, त्यामुळे तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीत ९ ऑगस्ट पूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे जवळपास १५० ते २०० लसींचे नियोजन न केले गेल्यास मालवण पंचायत समिती कार्यालया समोर दि. ९ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसू, असा इशारा तारकर्लीचे ग्रा. पं. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. तारकर्ली ग्रामपंचायत क्षेत्रात कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसचे तात्काळ नियोजन करावे ते न केल्यास आपण आमरण उपोषणास बसू या उपोषणास तसेच लसीकरणाच्या सावळ्या गोंधळास जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर जोपर्यंत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाच्या निर्णयावर आपण ठाम आहोत असेही डॉ. जितेंद्र केरकर यांनी म्हटले आहे.
