मालवण पं. स.चे माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांचा खुला सवाल
*⚡मालवण दि.०४-:* मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाचा प्रकल्पात इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला असून वाढत्या पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणारा आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील शेवटच्या वर्षातील १४ विद्यार्थ्यांच्या ग्रूप च्या मदतीने कणकवली तालुक्यातील हळवल या गावी राहणारे शरद दशरथ जाधव, सुमेध प्रमोद कासले या तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसह ओरोस आय टी आय मधील सुमेध दशरथ जाधव या तिघांच्या संकल्पनेतून ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवण्यात आला आहे हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागला असून हा एकदा चार्ज केल्यावर तीस किलोमीटर धावू शकतो व याची प्रवासी क्षमता तीनशे किलो पर्यंत आहे. हा ट्रॅक्टर बनविण्यासाठी तिघांना अंदाजे ३५ ते ३७ हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे हा ट्रॅक्टर बनवण्यासाठी विशेष योगदान मालवण पॉलिटेक्निक कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक इंगोले, प्राचार्य सुरेश पाटील, सिंग सर, प्रा. योगेश महाडिक, कणकवलीत एसटी आगारातील दशरथ कृष्णा जाधव विजतंत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पुढील काळात हा मिनी ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी उपयोग होऊ शकतो कणकवली एसटी आगारात हा मिनी ट्रॅक्टर आणला असता एसटी कर्मचारी दशरथ कृष्णा जाधव, प्रमोद यादव डेपो मॅनेजर, प्रकाश मयेकर गौरेश लोकरे, गितेश कडू, इतर एसटी कर्मचाऱ्यांनी ही त्यांचे कौतुक केले.
