राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातून बारावी परीक्षेत मायकल डिसोजा, मयुरी कोटकर व संघमित्रा सावंत प्रथम

*⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राणी पार्वतीदेवी महाविद्यालय कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असून यात सायन्स मधून मायकल डिसोजा (९५.५०), कॉमर्स मधून मयुरी कोटकर (९६.८३), आर्ट्स मधून संघमित्रा सावंत (९६.६७) असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page