विनसम क्रीडा मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय अभंग महोत्सव

श्रावण महोत्सव निमित्त आयोजन

ओरोस-: सुप्रसिद्ध पखवाज वादक कै. रवींद्र गावडे यांच्या स्मरणार्थ कणकवली तालुक्यातील वागदे येथील विनसम क्रीडा मंडळाच्यावतीने “श्रावण महोत्सव” निमित्त राज्यस्तरीय अभंग स्पर्धा – २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ३३३३ रुपये व आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक २२२२ रुपये व आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र तृतीय पारितोषिक ११११ रुपये व आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र तसेच उत्कृष्ट पखवाज वादक १००१ रुपये आणि सहभाग प्रमाणपत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक स्पर्धकाने मेल आयडी देणे बंधनकारक असून स्पर्धकाला अभंग गायनासाठी वेळ किमान ५ व कमाल ८ मिनिटांचा असणार आहे. स्पर्धकाने व्हिडिओ बनविताना सुरुवातीला स्पर्धेचे नाव, आपले नाव, व्हिडीओ ज्यादिवशी केलात तो दिनांक सांगणे बंधनकारक राहील.(ही वेळ अभंग सादरीकरणाच्या व्यतिरिक्त असेल) स्पर्धकांनी गायन करताना हार्मोनियम, तबला, पखवाज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. अभंग सादर करताना जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा सहभाग ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धकाला वयाची अट नाही. कोविड संदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी स्पर्धकांची राहील. व्हिडिओ ठळक असणे आवश्यक आहे. व्हिडिओ गुगल ड्राइव्ह वर अपलोड करून त्याची लिंक व्हाट्स अप वर टाकावा. साजेशा पोशाख परिधान करावा. व्हिडीओ स्वीकारण्याची अंतिम मुदत -२० ऑगस्ट २०२१ रात्रौ १२ पर्यंत असून निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९४०५७८३४८८ व ९४२०८४५२६८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page