जनावरांचा बंदोबस्त करण्याची असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांची मागणी
*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील असलदेत बिबट्या आणि गवा रेड्यांची दहशत निर्माण झाली असून एका काजू कलमांची नासधूस केली आहे तर दोन दिवसांपूर्वी बिबट्या ने एका शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा गिळंकृत केला आहे. या दोन जंगली जनावरांची कुच लोकवस्तीच्या दिशेने सुरू झाली असून नागरिक सध्या या जंगली जनावरांच्या दहशतीखाली वावरत आहेत. असलदे येथील प्रगतिशील शेतकरी असलेले विनोद विजय तांबे यांच्या काजू कलमांची लागवड व फळ भाजीपाला बाग आहेत येथीलच बागेत रात्री वस्तीसाठी गवे रेडे येत असून त्यांच्या बागेचे नुकसान केले आहे. घटनास्थळी वनविभागाच्या फोंडाघाट येथील श्री मणेर यांनी येत पंचनामा केला आहे. या दोन्ही जंगली जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी वनविभाग यांच्याकडे केली आहे.
