पाहणी वेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे आश्वासन;नुकसान भरपाई मिळण्यासाठी करणार प्रयत्न
*⚡दोडामार्ग दि.३०-:* कळणे मायनिंग येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत तसेच स्थानिक ग्रामस्थांन सोबत भेट देत पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतः शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, रामचंद्र तुळसकर, सुदेश तुळसकर, ग्रा.प. सदस्य अजित देसाई, विष्णू नार्वेकर, शफिक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, इफ्तिकार राजगुरू, आसिफ ख्वाजा, संतोष जोईल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
