सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रुग्ण सापडले

*सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बिरोडकार टेंब २, उभा बाझार १, जुना बाझार १, झिरंग १, सबनीसवाडा २, सालईवाडा ५, खासकील वाडा १, तर ग्रामीण भागात माडखोल ३, इन्सुली ४, नेतर्ड ३, माजगाव १, कारिवडे २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १८४ रुग्ण सक्रिय आहेत .

You cannot copy content of this page