कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देणार

सभापती मनोज रावराणे यांचे संदीप मेस्त्री यांना आश्वासन

*⚡कणकवली दि.३०-:* कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या अशी मागणी कलमठ ​​ग्रा. प. सदस्य संदीप मेस्त्री यांनी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे केली आहे.सभापती मनोज रावराणे ​यांनी यावेळी सकारात्मकपणे लवकरात लवकर कलमठ गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन दिले. कलमठ गावातील ग्रामविकास अधिकारी पदी गेले ४ महीने प्रभारी असल्याने गावात काम करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कलमठ गाव विस्तार आणी लोकसंख्या पाहता कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी असणे गरजेचे आहे​.​ कोविड काळात देखील कलमठ गाव हॉटस्पॉट असताना ग्रामविकास अधिकारी प्रभारी व आठवड्यातुन फ़क्त २ दिवस कामकाज पाहत असल्याने कलमठ वासियांची ससेहोलपट होत आहे तरी आपण कलमठ सारख्या शहरी आणि विकसित गावाला कायम स्वरूपी ग्रामविकास अधिकारी देऊन कलमठ वासियांची अडचण दूर करावी अ​शी मागणी यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी कणकवली पंचायत समिति सभापती मनोज रावराणे यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी जि​.​ प​.​ अध्यक्ष संदेश सावंत, पं​.​ स​.​ सदस्य मिलिंद मेस्त्री यावेळी उपस्थित होते

You cannot copy content of this page