रावजी यादव कोकण आयुक्त कार्यालयासमोर करणार उपोषण

नंददीपक जाधव यांच्यावर अन्याय झाल्याचे कारण

*⚡ओरोस ता.३०-:* लाड-पांगे समितीच्या शिफारशी नुसार देण्यात आलेली नियुक्ती शैक्षणिक पात्रतेनुसार न दिल्याने सिंधुदुर्गचे सहाय्यक समाज कल्याण उपायुक्त जयंत चाचरकर यांच्या विरोधात दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष रावजी यादव कोकण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबत निवेदन त्यांनी कोकण आयुक्त यांना दिले आहे. लाड पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे आपल्या मुलाला नोकरी मिळेल या आशेने कुडाळ तालुक्यातील साळगाव गावचे रहिवासी अनंत भिकाजी जाधव हे सन 2010 मध्ये नियत सेवानिवृत्त झाले आणि त्यावेळेपासून आपल्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी समाजकल्याण खात्याची पत्रव्यवहार करता करता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आपण याबाबत १५ ऑगस्ट २०२० रोजी उपोषण करणार असल्याची नोटीस समाजकल्याण पुणे आयुक्त यांना पाठविली. त्यामुळे आदल्या दिवशी 14 ऑगस्ट 2020 ला जयंत चाचरकर यांना तुम्हाला वर्ग 4 ची पदभरती चे अधिकार असताना तुम्ही नंददीपक जाधव यांना गेली दहा वर्ष नोकरीपासून वंचित का ठेवले ? तुमच्या वर शिस्त भंगाची कारवाई का करु नये अशी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या कारणे दाखवा नोटीसीतून आपला बचाव होण्यासाठी जयंत चाचरकर यांनी नंददीपक जाधवला सफाईगार पदावर नेमणूक देऊन आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सफाईगार सारखी वर्ग 4 ची पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने बंदी घातलेली माहिती असून सुद्धा, तसेच समाजकल्याण खात्याच्या अंतर्गत कोकण झोन मध्ये वर्ग 3 ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना, त्याचप्रमाणे लाड पागे समितीच्या शिफारशी संदर्भातल्या शासन निर्णयानुसार सफाईगार कर्मचाऱ्यांच्या वारसाची शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देण्याची तरतूद असताना सुद्धा जयंत चाचरकर यांनी नंददीपक जाधव याला सफाईगार पदावर नेमणूक दिली. म्हणून मी पुणे आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. तरीही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे त्यामुळे कोकण विभागाचे विकासक कोकण विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर २ ऑगस्टला उपोषण करणार आहे, असे दिलेल्या नोटीसमध्ये रावजी यादव यांनी नमूद केले आहे. नंददीपक जाधव याला वर्ग ३ ची नियुक्ती मिळावी, अशी मागणी त्यांची आहे.

You cannot copy content of this page