सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १० रुग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी तालुक्यात आज १० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात माठेवाडा परिसरात एक रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात माडखोल १, कवठणी ३, इन्सुली २, निरवडे १, वेरले १, सांगेली १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात १८६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page