मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेकडून मत्स्य अधिकाऱ्यांचा सत्कार

*💫मालवण दि.२७-:* राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेतर्फे मत्स्य व्यवसाय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर, सहायक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, आश्लेषा गोळवणकर यांचा सत्कार करण्यात आला. तौक्ते वादळात नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मत्स्य अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्या बरोबरच इतर सहकार्य केले. म्हणूनच आज मच्छीमारांना मदत प्राप्त झाली आहे. मत्स्य विभाग मच्छीमाराना करत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मत्स्य अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे, यापुढेही मच्छीमारांना मत्स्य अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, असे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक व नगरसेविका सौ. सेजल परब, नगरसेविका सौ. तृप्ती मयेकर, नगरसेविका आकांक्षा शीरपुटे, बबन शिंदे, संमेश परब, सौ. दीपा शिंदे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page